सोलापूर : पॉलिसी बझार कंपनी मधून बोलत असल्याचे भासवून अमर मोहन मोरे यांना विविध पॉलिसी काढल्याचे भासवून ९६ हजार रुपयांना फसवल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पॉलिसीची बनावट कागदपत्रे ई-मेल द्वारे तसेच कुरियरने पाठवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही फसवणूक २४ फेब्रुवारी ते ९ मे २०१९ पर्यंत झाल्याचे अमर मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे . विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगताप अधिक तपास करीत आहेत.