येस न्युज मराठी नेटवर्क : ३१ डिसेंबर दिवशी गड किल्ल्यावर होणाऱ्या पार्टी रोखण्यासाठी 31- 12 -22 या दिवशी गड किल्ले संवर्धन संस्था. महाराष्ट्र राज्य मुबंई यांच्या वतीने किल्ले वसई महादरवाजा येथे खडा पहारा देण्यात आला. संस्थेच्या वतीने गड किल्ल्यांचे पावित्र्य राखले पाहिजे असा संदेश सांगून जन जागृती करण्यात आली. तसेच गाड्यांमध्ये दारूच्या बाटल्या आहेत का, हे स्व:ता गाडी चालकाच्या वतीने दाखवून तपासण्यात आले. ज्या दारू च्या बाटल्या सापडल्या त्या जप्त करण्यात आले.या मोहिमेचे आयोजन मुंबई विभाग प्रमुख- शुभम राणम,अध्यक्ष- वैभव राणे, उपाध्यक्ष- शंकर माळकर,संपर्क प्रमुख-गौरव पाटील, पंकज पुजारी, शुभम फाटक यांनी केले. या मोहीम मध्ये- सचिव विक्रांत मोरये, तेजस जाधव,प्रतिक गमरे,राकेश फाटक,प्रनय फाटक,विघ्नेश तावडे,राजेश काळे,गुरू काळे,अक्षय कोकरे,संदीप कोकरे,सुरेश घाडी,विशाल हातगे,यासिर कांबळे,ओंकार परब,सूमित आचरे,ओमकार केळबेकर,प्रसाद वणे,सामिन शिंगे,प्रथमेश मांजरेकर,सूप्रिता नर,सायली पांचाल,नितीन नारकर,सुहास जगताप,संकेत मिशाळ,शुभम म्हादये,किशोर ठूकरूल,पुंडलिक घाडी, अविनाश अनभवने असे 40 शिवभक्त उपस्थितीत होते.तसेच वसई पोलीस ठाणे PSI विष्णू वाघमोडे, आर पाटील .पुरातत्व विभाग अधिकारी ऐ.पी.जैन ,.शिंदे ,सुरक्षारक्षक अब्दुल अनसारी स्थानिक ग्रामस्थ यांचे तसेच पर्यटकांचे सुद्धा विशेष सहकार्य लाभले.