सोलापूर – नवीपेठ व्यापारी असोसिएशन चे माजी अध्यक्ष माणिक धनराज गोयल यांचे आज रविवारी सकाळी निधन झाले. मृत्युसमयी ते 81वर्षाचे होते. त्यांची अंतिम यात्रा आज दुपारी 4 वाजता धनराज महल, सुभाष चौक, किल्ला गार्डन येथून काढण्यात येणार आहे. जुना पुणे नाका येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.