पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं आहे. पाकिस्तानच्या मीडियाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. परवेज मुशर्रफ प्रदीर्घ काळ आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची परंतु, आज त्यांची प्रकृती जास्त खालावली असल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे.
परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं फाशीची शिक्षा सुनावली होती.
मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा
परवेज मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुशर्रफ यांच्यावर डिसेंबर 2013 मध्ये 3 नोव्हेंबर 2007 रोजी देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते. मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 या कालावधील पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कारभार सांभाळला.