सोलापूर मधील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे आज सकाळी नऊ वाजता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. गेलं काही दिवसापासून त्या वृद्धापकाळाने आजारी होत्या. त्यांचा पार्थिव अकराच्या सुमारास मुरारजी पेठ तोरणा बंगला येथे आणण्यात येणार असून सायंकाळी पाच वाजता पुणे रोड बाळे स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलं ,सुना, नातवंड असा परिवार आहे.