येस न्युज मराठी नेटवर्क : भारतिय जनता पक्षाचे कट्टर कार्यकर्ते माजी नगरसेवक दत्तात्रय सखाराम उर्फ बंडु कुलकर्णी यांचे आज शासकिय दवाखान्यात निधन झाले.अगोदर कोविडने आजारी होते त्यातुन ते बरे झाले म्हणुन त्याना सामान्य वार्ड येथे हलवले होते. गेली काही दिवस त्यांच्या प्रकृतीत चड उतार सुरु होते. शेवटी मृत्युने गाठले.
भाजपाचा प्रामाणिक व कष्टाळू कार्यकर्ता म्हणुन त्यांची ओळख होती. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा भाग म्हणौन त्यांच्या प्रभागातील प्रत्येक मतदांरा पर्यन्त पोहचणारा नगरसेवक अशी पण त्यांची कार्यपध्दती होती . ते सोलापूर महानगर पालिकेत विरोधी पक्ष नेता म्हणुन होते त्याःची ती पण कारकिर्द सोलापुरकरांच्या लक्षात राहील अशी होती ते स्थाई समिती सदस्य पण होते महापालिकेची स्थायीची बैठक झाली हे दुसर्या दिवशीच्या वर्तमानपत्रात त्यांनी घातलेल्या वादविवाद प्रसिध्दीपत्रकात वाचावयास मिळत होते. ते भारतिय मजदुर संघाचे पण कार्यकर्ते होते सोलापूरात रिक्षा संघटना उभी करण्यात त्यांचा वाटा होता. ऐका हरहुन्नरी प्रामाणिका स्पष्ट परखड बोलणारा अशा कार्यकर्याला भारतिय जनता पार्टी गमावुन बसली आहे.