येस न्युज मराठी नेटवर्क : निराळे वस्ती भागांमध्ये पहिल्यांदाच हे वारकरी संस्कार शिबिर होत असल्याने याचा उपयोग लहान मुलांना भरपूर होणार आहे आणि नवीन पिढी वारकरी संप्रदायाला संलग्न होणार असल्याने खूप आनंद होतोय. असे प्रतिपादन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.
श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था व हरिपाठ परिवार तसेच निराळे वस्तीतील सर्व भजनी मंडळाच्या सहकार्याने निराळे वस्ती येथे वारकरी संस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.हे शिबिर मोफत घेतल्यामुळे गरीब मुलांना याचा भरपूर फायदा झाला आहे.असे मत निळोबा महाराज जांभळे यांनी केले. तसेच या मोबाईलच्या युगामध्ये मोबाईल पासून दूर ठेवून संस्कार घडविण्याचे खूप महत्त्वाचे काम या परिवाराने केले आहे. असे प्रतिपादन उद्घाटक दत्तात्रय महाराज शिंदे यांनी केले. तत्पूर्वी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ह.भ.प. निळोबा जांभळे व ह.भ.प.दत्तात्रय महाराज शिंदे यांच्या शुभहस्ते या शिबिराचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या प्रमुख पाहुण्यांचा सन्मान प्रशिक्षक अनिकेत जांभळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये 30 मुली 25 मुले आणि तीन महिलांनी सहभाग घेतला आहे. हे शिबिर 18 मे पर्यंत सुरू राहणार आहे. या शिबिराच्या उद्घाटनाला संजय केसरे , गणेश शिंदे,सचिन भोसले यांचे प्रमुख उपस्थिती होती. हे शिबिर संपन्न करण्यासाठी तुकाराम लोखंडे, गुरुनाथ ताटे,अंजली लोखंडे, मयुरी एमगवळी. श्रुती गंभीरे, वैष्णवी जावळे,राजवीर जांभळे,समर्थ कांबळे ,स्वराज केसरे तसेच प्रशिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी प्रयत्न करीत आहेत. या संपूर्ण शिबिराचे नियोजन बळीराम जांभळे महाराज यांनी केले.