येरमाळा : येरमाळ्यातील येडेश्वरी देवीचा याञा उत्सव सध्या सुरू आहे. उत्सवातील चुनखडी वेचण्याच्या मुख्य कार्यक्रम चुन्याच्या रानात पार पडला. यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झालेत. येडेश्वरी देवीची पालखी पुढचे पाच दिवस आमराईच्या रानात मुक्कामी असणार आहे. दरम्यान आज येडेश्वरी देवीच्या पालखीवर आज हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.



हेलिकॉपटरमधून येडेश्र्वरी देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी आई राजा उदो उदो च्या जयघोषात लाखोंच्या जनसमुदायाने घेतले येडेश्वरी देवीचे दर्शन येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञेतील मुख्य चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला राज्यभरातून लाखो भाविक झाले सहभागी तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणुन स्थानिक श्रधेनुसार येडेश्वरी देवीची ओळख आहे .. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणुन स्थानिक श्रद्धेनुसार ओळखल्या येरमाळा नगरीत येथील येडेश्वरी देवीच्या चैञ पोर्णिमा याञा उत्सव सुरू असुन या याञा उत्सवातील मुख्य असलेला चुनखडी वेचण्याच्या मुख्य कार्यक्रम चुन्याच्या राणात पार पडला दरम्यान यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदीरातुन आठवडी बाजार मार्गे आमराईच्या राणात नेण्यात आली असुन पुढील पाच दिवस आमराईच्या राणात ही पालखी मुक्कामी असणार आहे. दरम्यान हेलिकॉप्टर मधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.अशी माहिती येरमाळा येथील राहवसी शीतल पलंगे यांनी दिली आहे