स्वच्छ सुजल गाव संकल्प मोहिमेची सामुहिक शपथ..
सोलापूर – भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी तिरंगा राष्ट्रध्वजास सामूहिक मानवंदना देणेत आली. सिईओ कुलदीप जंगम यांनी जिल्हा वासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सिईओ कुलदीप जंगम पुष्पहार अर्पण केला. अतिरिक्त सिईओ कुलदीप जंगम व उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आरती आरती ओवाळून अभिवादन केले.



सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले. हरिभाई देवकरण प्रशालेचे विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व बहारदार महाराष्ट्र गीत सादर केले. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वच्छ सुजल गाव संकल्प मोहिमेची शपथ दिली. सिईओ कुलदीप जंगम यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना भेटून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, म्हाडा चे संचालक अजयसिंह पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुलक्षणा सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी हरिदास हावळे,उप कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरीबा सपताळे, जिल्हा निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी उप शिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे, लेखाधिकारी श्रीकांत मिरगाळे प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण विभागाचे वतीने सिईओ जंगम यांचे हस्ते सन्मानपत्र वाटप करणेत आले. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी गुरव यांनी केले. तर प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी आभार मानले.