सोलापूर: जागृती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला नेहरूनगर सोलापूर येथे भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात प्रशालेत साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अनिल ज्ञानेश्वर सगर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मुख्य अभियंता हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य विजयरत्न चव्हाण हे होते सर्वप्रथम प्रशालेची क्रीडाशिक्षक संतोष जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन भारतीय तिरंगा फडकवण्याची विनंती केली.
प्रमुख पाहुणे अनिल सगर यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य विजयरत्न चव्हाण ज्येष्ठ शिक्षक यशवंत जाधव म्हमाणे एम एल सांस्कृतिक विभाग प्रमुख नलिनी राठोड,कांचन चव्हाण व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते व स्वातंत्र्य दिना विषयी माहिती कथन केली प्रमुख पाहुण्यानी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न याबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य विजयरत्न चव्हाण यांनी स्वातंत्र्य दिना विषयी व बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीराविषयी माहिती कथन केली .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेची सेवक अनिल रजपूत औदुंबर खताळ शिवानंद काळे संतोष चव्हाण यांनी परिश्रम घेतले..