येस न्युज मराठी नेटवर्क : किराणा दुकाना समोरील कचरा जेसीबी चालकाकडून काढून घेत असताना मुकेश ज्ञानेश्वर राठोड या प्रताप नगर तांडा येथे राहणाऱ्या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची फिर्याद देण्यात आली आहे. कमलाबाई लिंबाजी राठोड हिने प्रथम मुकेश राठोड याला दगडाने मारून जखमी केले. त्यानंतर लिंबाजी शंकर राठोड व इतर चार जणांनी मिळून मुकेशला फरफटत नेऊन जखमी केले. तसेच लिंबाजी राठोड यांनी घरातील कुऱ्हाड आणून मुकेश राठोड यांच्या डोक्यावर मारून जखमी केल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हाळ अधिक तपास करीत आहेत.