येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील ११११ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी आलेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले. यापैकी 685 पुरुष आणि 426 महिला आहेत. मंगळवारी रात्री बारा पर्यंत आलेल्या अहवालानुसार 24 तासात 18 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यामध्ये 14 पुरुष आणि चार महिला आहेत . बार्शी करमाळा आणि माढा तालुक्यातील शंभरावर लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. बार्शीत 126 करमाळा 125 आणि माझ्यात 155 नवीन व्यक्तींना कोरोना झाला असून जिल्ह्याच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे माळशिरस तालुक्यात 232 आणि पंढरपूर तालुक्यात 212 नवीन व्यक्तींना कोरोना झाला आहे . मृतांमध्ये एकटा पंढरपूर तालुक्यातील पाच जणांचा मृत्यू झाला असून मंगळवेढा तालुक्यातील पाच जणांचा कोरोना मुळे मृत्यू ओढवला आहे. मोहोळ मधील तीन जणांचा तर बार्शी व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला. अक्कलकोट येथील एकाच कारोनामुळे मृत्यू ओढवला आहे . पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील विधानसभेची पोटनिवडणूक झाली होती . त्याच काळात कोरोना बाधितांची संख्या खूप वेगाने वाढली होती आणि हा आकडा अजूनही कमी होत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.