• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिंदे गटाची कागदपत्रं मिळालीच नाहीत, ठाकरे गटाचं आयोगाला पहिलं लेखी निवेदन

by Yes News Marathi
October 7, 2022
in मुख्य बातमी
0
शिंदे गटाची कागदपत्रं मिळालीच नाहीत, ठाकरे गटाचं आयोगाला पहिलं लेखी निवेदन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात सुरु झाली आहे. आजवर दोनवेळा मुदतवाढ मागणाऱ्या ठाकरे गटानं आज पहिल्यांदाच आपलं प्राथमिक लेखी निवेदन आयोगात सादर केलं. शिंदे गटाची कागदपत्रं आम्हाला अद्याप मिळालेली नाहीत अशी तक्रार करत ठाकरे गटानं आज निवडणूक आयोगात आपली बाजू मांडली. बाजू मांडण्यासाठी ठाकरे गटाला आज शेवटची मुदत होती. पक्षावर अजूनही आमचं वर्चस्व आहे हे सांगतानाच सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासाठी आपल्याला किमान 15 ते 20 दिवसांचा वेळ मिळावा ही मागणी ठाकरे गटानं केलेली आहे.

अंधेरी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिंदे गटानंही आयोगाला पत्र लिहून चिन्हाचा निर्णय तातडीनं व्हावा ही विनंती केली आहे. आपल्या बाजूनं 40 आमदार, 12 खासदार, 144 पदाधिकारी, 11 राज्यप्रमुख असल्याचा दावा शिंदे गटानं आयोगासमोर केलेला आहे. सोबतच 1 लाख 66 हजार 764 प्राथमिक सदस्यत्वांची शपथपत्रंही सादर करण्यात आलीत. अर्थात याला तोडीस तोड उत्तर देण्याच्या तयारीत ठाकरे गटही आहे. कारण प्रतिनिधी सभेतले 70 टक्के सदस्य, 260 पैकी जवळपास 160 सदस्य हे आमच्याच बाजूनं असते.

पक्षाच्या घटनेत ही सभा सर्वात महत्वाची असते असं सांगत पक्षावरचा दावा ठाकरे गटानं सांगितला आहे. शिवाय 10 लाख प्राथमिक सदस्यांची शपथपत्रंही आयोगाला सादर करण्याच्या तयारीत ठाकरे गट आहे. आज निवडणूक आयोगात ठाकरे गटाच्या वकिलांनीच सगळी कागदपत्रं सादर केली. पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायला 14 तारखेपर्यंतचीच मुदत आहे. त्याआधी आता निवडणूक चिन्हाचं नेमकं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं की, आयोगाने 7 ॲाक्टोबरपर्यंत सबमिशन सादर करण्यास सांगितले होते. आज आम्ही कागदपत्रे सादर करतोय. शिंदे गटाने सादर केले कागदपत्रे आम्हाला मिळाले नाहीत. या प्रक्रियेला काही वेळ लागतो. मुदतवाढ देणं हे निवडणूक आयोगाला क्रमप्राप्त आहे. यासाठी काही वेळ लागणार आहे. तो वेळ दोघांसाठीही मिळणार आहे. कोणताही दावा केला तरी पक्षाची आपली घटना असते. त्या घटनेनुसार काम करावं लागतं. राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरेंना लोकशाही पद्धतीने निवडून दिली आहे. त्यामुळे ठाकरे हेच अध्यक्ष आहेत, असं देसाई यांनी म्हटलं आहे.

Previous Post

परळीच्या मराठमोळ्या श्रद्धा गायकवाडची सुवर्णपदकाला गवसणी, ऑलम्पिक स्पर्धेसाठीही निवड

Next Post

यंदा सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास आर्ची येणार; रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार युवा महोत्सव!

Next Post
यंदा सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास आर्ची येणार; रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार युवा महोत्सव!

यंदा सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास आर्ची येणार; रविवारपासून मंगळवेढ्यात रंगणार युवा महोत्सव!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group