खेड सोलापूर येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज इथे विद्यार्थी व शिक्षकांसाठी "प्रथमोपचार प्रशिक्षण " कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या प्रशिक्षणातून डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी आपत्कालीन परिस्थितीत निरनिराळ्या आजारामध्ये योग्य ते प्राथमिक उपचार कसे करावे याबद्दलचे मार्गदर्शन केले. तसेच जखमेवर मलम पट्टी कशी करणे,रक्तदाब मोजणे,याचे प्रात्यक्षिक ही करून दाखविले. शिवाय सर्पदंश, फिट्स येणे, रक्तस्त्राव होणे, भाजणे, चक्कर येणे,पोहताना पाण्यात बुडणे इ .परिस्थितीत तात्काळ करावयाचे उपाय याबाबत मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेला एसवीआयटी कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती. कीर्ती भोसले , श्री कुलकर्णी सर, श्रीमती सुहासिनी शिंदे यांच्यासह सर्व विभागाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.