येस न्युज मराठी नेटवर्क : इचलकरंजी येथील टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग आहे. फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यंत्रमाग कारखान्याला आग लागल्यामुळे करोडो रुपयाचे नुकसान झाले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणतीही जीवित हानी झालेले नाही आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची घटना आज सकाळी ९ च्या सुमारास घडली आहे. पहिल्यांदा फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला आणि मग पाहता पाहता आग पूर्ण फॅक्टरी मध्ये पसरली आहे. तसेच बाजूच्या यंत्रमाग कारखान्याला देखील आग लागल्यामुळे करोडो रुपयाचे नुकसान झाल्याचे कळत आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाले आहेत.अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आत मध्ये जाता येत नसल्याने बाहेरून पाणी मारून आग विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही.