कोंतम चौकातील रंगरेज कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशमन यंत्रणा तत्काळ घटनास्थळावर दाखल झाल्याने आग लवकरच आटोक्यात आली.यासाठी जवळपास पाच बंब वापरण्यात आले. गुरुवारी रात्री कौंतम चौक परिसरातील रंगरेज दुकानातून धूर येत असल्याचे लक्षात येताच भाजपाचे माजी शहर उपाध्यक्ष राजकुमार पाटील यांनी अग्निशमन विभागाला सूचना दिली. माहिती मिळताच अवघ्या चार मिनिटात अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी पोहोचले.तळमजल्यावर आग लागल्याचे दिसले. दुकानाचे शटर उघडून आतील आग विझवण्यात आली. यामुळे वरील बाजूस आग पोहोचली नाही. आग पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अग्निशामन विभागाचे प्रभारी प्रमुख मुख्य अग्निशमन अधिकारी अच्युत दुधाळ व इतर जवान यांच्या कार्य तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले व फार मोठी दुर्घटना टळली.

