येस न्युज मराठी नेटवर्क : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. मांजरी परिसरातील गोपाळपट्टा भागात ही आग लागली आहे.
मात्र, सुदैवानं कोव्हिशील्ड लस सुरुक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचं काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला असलेल्या गेट आहे, तिथे ही आग लागली आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नसल्याची माहिती मिळत आहे. कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मितीचं काम हे गेट नंबर 3, 4 आणि 5 या परिसरात बनवली जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मांजरी परिसरात सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीचं काम सुरु आहे. यात इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला ही आग लागली आहे. सुदैवाची बाब म्हणजे या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळत आहे.