येस न्युज मराठी नेटवर्क :- आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल २०२०-२१ शुक्रवारी २९ जानेवारी रोजी संसदेत सादर केला जाईल. निर्मला सीतारामन हा अहवाल संसदेपुढे मांडतील.आर्थिक सर्वेक्षण पाहणीमध्ये कशाचा समावेश असेल ?- आर्थिक सर्वेक्षण पाहणी हा अर्थ खात्याचा महत्वाचा दस्तावेज आहे. सरत्या आर्थिक वर्षात सरकारने कोणती विकास कामे केली, किती खर्च केला, सरकारने निधी कसा जमवला याचा लेखाजोखा मांडला जातो.- आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल हा केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या मार्गदर्शनात तयार केला जातो. आर्थिक वर्षातील देशातील प्रगती याचा आढावा यात घेतलेला असतो.-यंदाचे अर्थसंकल्प (बजेट) येत्या सोमवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत सादर करतील.
‘बजेट’चे थेट प्रक्षेपण पाहता येईल का ?-
होय, केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण लोकसभा वाहिनीवर केले जाणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता लोकसभा वाहिनीवर थेट प्रक्षेपण सुरु होईल. त्याशिवाय अर्थ मंत्रालयाच्या सोशल मीडिया हॅन्डलवर देखील याची अद्ययावत माहिती दिली जाईल.