इंदापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेस प्रशासकीय मंजुरी दिली असून सन २०२१-२२ च्या दरसुची वर आधारित ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किमतीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.मंत्री भरणे पुढे म्हणाले, लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना ही महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा अंतर्गत उर्वरित महाराष्ट्र या विभागात येते. या योजनेचा उदभव उजनी धरण पाणलोट क्षेत्रात इंदापूर तालुक्यातील मौजे कुंभारगावयेथून असून पहिल्या टप्प्यात ५०.१० मीटर, दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ५१.२० मीटर व ७३.२० शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील दहा गावातील ४३३७ हेक्टर व बारामती तालुक्यातील ७ गावातील २९१३ हेक्टर असे एकूण ७२५० हेक्टर अवर्षण प्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.
यासाठी ०.९० अब्ज घन फूट पाणी कुंभारगाव येथून उपसा करणे प्रस्तावित आहे. या योजनेच्या लाभक्षेत्राच्या उत्तर बाजूस नवीन मुठा उजवा कालवा तसेच दक्षिण बाजूस नीरा डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र असून या दोन्ही कालव्याच्या मध्ये सिंचनापासून वंचित क्षेत्रास या योजनेद्वारे सिंचनाचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ही योजना भीमा प्रकल्पाचा भाग असल्याने या योजनेस प्राधिकरणाची मान्यताघेण्याचीआवश्यकता नाही. योजनेचा खर्च ४७०१ मोठे व मध्यम पाटबंधारे यावरील भांडवली खर्च, १९० सार्व जनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूक, पाटबंधारे विकास महामंडळाना भाग भांडवली अंशदान,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकासमहामंडळास भाग भांडवली अंशदान गुंतवणूका या लेखाशिर्षा खाली टाकण्याचे आदर्श राज्यपाल महोदय यांच्या वतीने शासनाच्या कार्यासन अधिकारी सुनिता गायकवाड यांनी दिले असल्याचे शेवटी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी मंत्री भरणे यांनी आपली राजकीय कारकीर्द पणास लावली होती. हा प्रश्न सुटला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी येणार नाही अशी जहिर्गर्जनामंत्री भरणे यांनी इंदापूर येथील सभेत केली होती. ही योजना मार्गी लागावी यासाठी मंत्री भरणे यांनी जीवाचे रान केले होते.