सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती दिलीप माने तर उपसभापती सुनील कळके आ. सचिन कल्याणशेट्टी यांचे समर्थक यांची बिनविरोध निवड झाली आहे. ४ मे रोजीच येस न्युज मराठीच्या टॉप २५ बातमीत सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने म्हणून बातमी दिली होती. ती आज तंतोत खरी ठरली आहे.
जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली. सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलीप माने यांचे नाव सभापतिपदासाठी, तर उपसभापतिपदासाठी सुनील कळके यांचे नाव जाहीर केले. त्यानुसार दोघांनीच सभापतिपद आणि उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केले.
निर्धारित वेळेत माने आणि कळके यांच्याशिवाय इतर कोणाचे अर्ज आले नाहीत, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी गायकवाड यांनी माने आणि कळके यांची बिनविरोध निवड जाहीर केली आहे. माने आणि कळके यांची ही नियुक्ती दोन वर्षांसाठी असणार आहे. त्यानंतर इतर संचालकांना संधी दिली जाणार आहे, असे कल्याणशेट्टी यांनी जाहीर केले.
राज्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांनी दणदणीत यश मिळवले आहे. त्यांच्या पॅनलला 18 पैकी 13 जागा मिळाल्या. त्यामुळे आता सभापती पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली होती. त्याला आज पूर्ण विराम मिळाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती दिलीप माने तर उपसभापती सुनील कळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन दिवसापूर्वीच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारगोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे,सुरेश हासपुरे, दिलीप माने,राजशेखर शिवदारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या निवणुकीत आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला अवघ्या तीन जागा मिळाल्या. बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून भाजपमध्ये दोन गट पडल्याचे उघडपणे दिसले.दिलीप माने हे आता सभापती झाल्यामुळे सोलापूर बाजार समिती मध्ये काय बदल दिसणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.