सोलापूर – महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी उपमहापौर राजेश काळे विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून उपमहापौर राजेश काळे फरार होते. आज मंगळवारी सकाळी क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी राजेश काळे यांना अटक केले आहे. टेंभुर्णी पासून पुणे येथे जात असताना उपमहापौर काळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे.