मुंबई : अनिल देशमुखांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका होणार आहे. दरम्यान, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची उद्या आर्थर रोड कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. 17 दिवसांच्या स्थगितीत जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात सीबीआयला अपयश आलं आहे. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे.
सुनावणीत काय झालं?
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला होता. पण, सीबीआयच्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती (Stay on Bail Order) देण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयनं न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयानं सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली होती. त्यामुळे जामीन मिळूनही अनिल देशमुखांना तुरुंगातच राहावं लागलं होतं. अखेर आज हायकोर्टानं जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी फेटाळली आणि अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.