येस न्युज मराठी नेटवर्क : खड्डा तालीम परिसरात जमाव जमवून गोंधळ घातल्याने जेलरोड पोलिसांनी समीर राजअहमद सय्यद , अबरार शेख , राजकुमार पाटील, संतोष हुंडेकरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 20 मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या दगडफेकीमध्ये अक्षय अमर खांडेकर या तरुणाच्या उजव्या भुवईजवळ दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जेलरोड पोलिस ठाण्याचे हवालदार बापूराव घुगे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पोलीस सब इन्स्पेक्टर बादोले अधिक तपास करीत आहेत.