सोलापूर : येथील मड्डी सर्टिफाइड ग्राउंड येथे आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार मनाई आदेश असताना देखील मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यामुळे अंबादास कवी जाधव, नागनाथ गायकवाड, प्रवीण गायकवाड आदी सात जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक कुंभार तपास करीत आहेत.
*
50 हजारांच्या दागिन्यांची चोरी
रविवार पेठ येथील लक्ष्मी अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील श्रीरंग रेगोटी यांच्या फ्लॅटचा दरवाजा कडी व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटात 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या दागिन्यांमध्ये 37 हजारचे सोन्याचे झुमके दहा हजारांची नाकातील नथ आणि तीन हजार रुपयांचे सोन्याचे लॉकेट मधील बदाम असा ऐवज असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस सबइन्स्पेक्टर शेख अधिक तपास करीत आहेत.
*
नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल…
जुळे सोलापूर येथील टाकळीकर मंगल कार्य समोरील गंगा लॉन्स येथे भटक्या विमुक्त मुक्ती दिना निमित्त आयोजित केलेला निर्धार मेळावा वेळेपेक्षा अधिक काळ चालू ठेवला तसेच covid-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मेळाव्याचे आयोजक शरद कोळी आणि 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार वाल्मीकी अधिक तपास करीत आहेत