सोलापूर: जरिया फाउंडेशन च्या वतीने “अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त” व सोलापूर शहर मध्ये च्या लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त 15,000 वह्या वाटपाचा कार्यक्रम शहरातील सोशल प्राथमिक शाळा, सोशल हायस्कूल, पानगल हायस्कूल, कमरूनिसा गर्ल्स हायस्कूल, विडी घरकुल येथील सोशल हायस्कूल, तसेच बागवान नगर येथील फैसल स्कूल येथे शाळकरी विद्यार्थ्यांना वाया वाटप करण्यात आले. यावेळी पानगल हायस्कूल चे मुख्याध्यापक हारून रशीद बागवान आणि सोशल हायस्कूलचे मुख्याध्यापक असिफ इक्बाल यांनी अल्पसंख्यांक हक्क दिन या विषयावर मार्गदर्शन केले. जरीया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नजीब शेख यांनी अल्पसंख्यांक आणि समाज उपयोगी उपक्रम राबविणार असेही सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी कमरूनिसा गर्ल्स हायस्कूल महम्मद अली , मनपा शाळेचे इम्रान पठाण , सोशल हायस्कूलचे रसूल चौधरी , घरकुल येथील सोशल हायस्कूलचे धोठेघर, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इफ्तेकार तुळजापुरे, अजहर हरकारे,हाजी माज कामले, अल्ताफ बागवान साबीर पिरजादे, हाजी रब्बानी कुरेशी,व जरीया फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते