येस न्युज मराठी नेटवर्क : म्युझिक आर्ट डान्स अकॅडमी आणि स्वरनाद संगीत विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील फडकुले सभागृहात दसऱ्यापासून म्हणजेच 15 ऑक्टोबर पासून 17 ऑक्टोबर पर्यंत सकाळी अकरा ते नऊ या वेळेत फेस्टिवल दिवाळी शॉपिंग चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजक विकास गोसावी यांनी दिली
या प्रदर्शनामध्ये सुगंधी तेल उटणे अभंगस्नान किट साबण शाम्पू तसेच इंदोर नमकीन आणि फराळाचा देखील आस्वाद घेता येणार आहे पणत्या आकाश कंदील रांगोळी, चाट स्टॉल ,ब्युटीपार्लर ड्रेस साडी ज्वेलर्स टॅटू लाईटच्या माळा शोभेच्या वस्तू कार्पोरेट गिफ्ट चॉकलेट्स दिवाळीमध्ये बनवण्यात येणारे किल्ले आणि त्यांचे मावळे आणि विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद ग्राहकांना लुटता येणार आहे.
या प्रदर्शनाला सोलापूरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन विकास गोसावी यांनी केले आहे.