फौजदार चावडी पो.स्टे. हद्दीत ॲम्बेसिडर हॉटेलच्या समोर 03 वर्षाचा मुलगा बेवारस स्थितीत रडत असलेला पो. शि. वामने (बीट मार्शल) यांना मिळून आला. त्यांनी सदर बालकास सोबत घेऊन आजूबाजूच्या भागात विचारपूस केली परंतु सदर बालकाचे पालक मिळून न आल्याने सदर बालकास पोलीस स्टेशनला आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात दिले.
ऑपरेशन मुस्कान पथकाने सदर बालकास ताब्यात घेऊन त्याचा फोटो काढून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून सदर बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर प्रसारित केला. त्यामध्ये त्याच्या पालकांबाबत माहिती मिळाल्याने त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पोलीस ठाणेस बोलावून घेतले. सदर पालकांचे आधार कार्ड बघून सर्व खात्री करून सदर बालक कायदेशीर पालकांच्या ताब्यात दिले.
सदरचे बालक ऑपरेशन मुस्कान पथकाने केलेल्या प्रयत्नामुळे अवघ्या 04 तासात कायदेशीर पालकांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली
ऑपरेशन मुस्कान पथकाचे सपोनी. मोरेपाटील, पो. शि. पाटील व वामने यांनी केला आहे.