सोलापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर भागात असणाऱ्या कदम वस्ती इथं ट्रक आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला.
आज सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत जवळील रस्त्यावरून कार गाडीतून चौघे सोलापूरच्या दिशेनं निघाले होते. यावेळी कारच्या पुढं असलेल्या मालवाहू ट्रकनं अचानक ब्रेक दाबल्यानं पाठीमागं असलेल्या चारचाकी चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटून चारचाकी गाडी थेट ट्रकच्या खाली आली.