येस न्युज मराठी नेटवर्क : पथकर नाक्यावर वाहनांची कोंडी टाळणे व महामार्गावरील अखंड वाहतुकीसाठी ‘फास्ट टॅग’ प्रणालीला आता मुदतवाढ दिली जाणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. पथकर भरण्यास फास्ट टॅगसाठी सोमवारी १५ फेब्रुवारी अखेरची तारीख आहे.
फास्ट टॅगसाठी यापूर्वी २-३ वेळा मुदतवाढ दिली. ८० ते ९० टक्के मार्गावर हा प्रयोग यशस्वी झाला आहे. दहा टक्के शिल्लक आहेत. यापुढे मुदत वाढवणार नाही. सर्व पथकर नाक्यावर व अन्य ठिकाणी फास्ट टॅग आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तत्काळ खरेदी करावी, असे आवाहनही नितीन गडकरी यांनी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना केले.
ट्रोल, डिझेलवर होणाऱ्या खर्चात बचतीसाठी सीएनजीवरील वाहने चालवण्यास प्रोत्साहन दिले जात आहेत. डिझेलच्या तुलनेत एक किलो सीएनजी ५१-५२ रुपयात येतो. यावर चार किलोमीटर ट्रॅक्टर चालते. साधारणत: शेतातील वापरावरील ट्रॅक्टरची एक ते दीड लाख रुपये व मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवरील खर्चात तीन लाख रुपयांची बचत होईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पूर्व विदर्भातील सर्व सहाही जिल्ह्यातील ५ वर्षांच्या आत सर्व वाहने सीएनजीवर करण्यात येतील. नागपुरात काम सुरू झाले व कामठी रोडवर पंप उभारण्यात आला आहे. आधी ट्रॅक्टर, शहर बस, परिवहन महामंडळाच्या