येस न्युज मराठी नेटवर्क : प्रजासत्ताक दिनी कृषी कायदे रद्द करण्यासाठी निघालेल्या ट्रॅक्टर मार्चला हिंसक वळण लागून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गावरून ट्रॅक्टर मार्च न काढता शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये घुसून अनेक ठिकाणी लष्करी जवानांवर आणि पोलिसांवर हल्ला बोल केला .वेगाने ट्रॅक्टर वरून जाणारे शेतकरी अनेक भागात दिसत होते जय जीवा जय जवान जय किसान हा नारा देणाऱ्या लालबहादूर शास्त्रीनंतर आता दिल्लीमध्ये जवान आणि किसान समोरासमोर उभे ठाकलेले भारतीयांना पहावे लागले.
पोलिसांनी मेट्रो स्टेशन बंद करून शेतकऱ्यांना काबूत आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला .आंदोलन चालू असलेल्या भागात इंटरनेट सेवा तातडीने बंद करण्यात आली .राजधानी दिल्लीतल्या हिंसाचाराला जबाबदार कोण असा प्रश्न आता देशवासीय विचारत आहेत. संपूर्ण दिल्लीला वेठीस धरणाऱ्या शेतकऱ्यांनी गेले साठ दिवस शांततापूर्ण मार्गाने केलेले आंदोलन आजच्या प्रजासत्ताक दिनी पूर्णपणे बदनाम झाले. शेतकरी नेते म्हणून गेले साथदिवस जे नेते मिरवत होते ते अक्षरशः आंदोलन स्थळावरून पळून गेल्याचे दिसून आले दुपारी चार पर्यंत यापैकी एकही नेता हिंसाचार होत असलेल्या स्थळांवर दिसून आला नाही चार नंतर काही नेत्यांनी शेतकऱ्यांना संयम पाळण्याचे आवाहन केले त्यानंतर काही भागातून आंदोलक शेतकरी दिल्ली कडे येणाऱ्या बॉर्डरवर रवाना रवाना होत असल्याचे दिसून आले कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी गाड्या फोडल्या लष्करी जवानांवर हल्ले केले आणि वेगाने ट्रॅक्टर चालवत संपूर्ण दिल्लीला वेठीस धरले लाल किल्ल्यावर देखील हे आंदोलक शेतकरी चालून गेले आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही आंदोलक तलवारी फिरताना दिसून आले या आंदोलक शेतकऱ्यांमध्ये खालिस्तान वारी समाजकंटक असल्याचे पोलिसांनी सांगितले अर्थात याबाबत सरकारकडून दुजोरा मिळालेला नाही.दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे शहा यांनी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहेनवी दिल्ली अक्षरधाम नांगलोई सिंधु बॉर्डर बॉर्डर दिलशाद गार्डन आणि आयटी या भागात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे.