साखर कारखान्याला ऊस गेल्यानंतर 14 दिवसाचे आज शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा करणे एफ आर पी कायद्यानुसार बंधनकारक असले तरी सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी या कायद्याला पायदळी तुडवत नऊ महिने झाले तरी अजून शेतकऱ्यांना उसाची बिल जमा केले नाही.
धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी बीबीदारफळ व परिसरातील शेतकऱ्यांना शनिवार दिनांक 5 जुलै पर्यंत ऊस बिल जमा करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार शेतकऱ्यांनी कृषीदिनी केलेले आंदोलन मागे घेतले मात्र अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना बिल न मिळाल्याने आज संतप्त शेतकऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी व साखर आयुक्त यांच्या कार्यालयाला घेरा घालून कारखानदारावर कारवाईची मागणी केली.
साखर आयुक्त पुणे यांनी 25 मार्च 2025 रोजी आदेश काढून गोकुळ शुगर कारखान्यावर शेतकऱ्यांचे बिल न दिले कारणाने आर आर सी अंतर्गत कारवाई करून शेतकऱ्यांचे बिल अदा करण्यात यावे असा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला असला तरी अद्याप पर्यंत त्यावर कारवाई झाली नाही त्यामुळे कारखानदार बिनधास्त असून शेतकऱ्यांची बिल देण्यास बांधील नाहीत. पुढच्या हंगामातील यंत्रणा मुकादम यांना ऍडव्हान्स बिल देणे सुरू केले असून मागील वर्षातील शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल अद्याप पर्यंत देणेस कारखानदार टाळाटाळ करीत आहे . या कारखानदारावर कारवाई करून शेतकऱ्यांचे बिल देण्यास भाग पाडावे अशी मागणी बीबीदारफळ व परिसरातील शेतकऱ्यांनी साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे त्यावर सोलापुरातील संवेदनशील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांनी आशा लावून धरली आहे.