महाराष्ट्र शासन कृषी विभाग , आत्मा सोलापूर, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप 2026 अंतर्गत दिनांक 19 ते 21 जानेवारी 2026 तीन दिवसीय निवासी शेतकरी प्रशिक्षणास ज्ञान प्रबोधिनी प्रशिक्षण केंद्र हराळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी यांची पहिली बॅच रवाना झाली त्या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी सोलापूर देवेंद्र ढगे साहेब तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर अवधूत मुळे साहेब, मंडळ कृषी अधिकारी मंद्रूप किरण सावंत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी विशाल सूर्यवंशी, उमेद चे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, कृषी व्यवस्थापक कविता शिंदे, वैजनता मोरे ,पाणी फाउंडेशन विभाग समन्वयक सुशांत गायकवाड , पाणी फाउंडेशन समन्वयक आतिश शिरगिरे, तसेच प्रशिक्षणास जाणारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील 70 शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.

