सोलापूर : मनीषभैय्या देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा दक्षिण पश्चिम मंडलाच्या वतीने मंडल अध्यक्ष महेश देवकर यांनी सोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आरोग्यकेंद्र प्रमुख डॉ.वळसंगकर, डॉ.उप्पीन, डॉ .शिवराज सरतापे, ओबीसी सेल संघटन सरचिटणीस विशाल गायकवाड, मंडल सरचिटणीस आनंद बिराजदार, इकोनेचरचे मनोज देवकर , कुंभार मामा , मनीष गंजाळकर, कोळी, शिवराज भरलेसह अनेकजण उपस्थित होते.