सोलापूर : रॉबिनहूड आर्मीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षीही ‘वारी विठ्ठलाची भक्ती अन्नदानाची’ उपक्रमांतर्गत ८०४ जणांना फराळ वाटप केली. अशी माहिती हिंदुराव गोरे यांनी दिली. शहरातील कुष्ठरोग वसाहत, भारतमाता नगर, अशोक चौक परिसर, अक्कलकोट रोड परिसर, विडी घरकुल, नंदी वस्ती, विजापूर रोड परिसर, माशाळ वस्ती, सिद्धेश्वर मंदिर परिसर, रेल्वे स्थानक, शनी मंदिर, बलिदान चौक, बाळीवेस, जोडभावी पेठ, घोंगडे वस्ती, तळे हिप्परगा, पारधी वस्ती, बेघर निवास ठिकाणी उपवासाच्या पदार्थाचे वाटप केले. प्रा. अनिकेत चनशेट्टी, अपूर्व जाधव, आकाश मुस्तारे, विराज महेंद्रकर, ओंकार पाटील, स्वप्नील गुलेद, स्वामीराज बाबर आदींनी परिश्रम घेतले.