• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन

by Yes News Marathi
January 31, 2021
in मुख्य बातमी
0
प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : प्रसिद्ध गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यिक इलाही जमादार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या जाण्याने गझल विश्वात शोककळा पसरली आहे.

मराठी विश्वातील प्रसिद्ध गझलकार अशी इलाही जमादार यांची ओळख होती. इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे. इलाही जमादार यांनी 1964 सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी म्हणून इलाही जमादार यांची विशेष ओळख होती.

विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिक आणि मासिकांतून इलाहींच्या कविता आणि गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घ्यायचे. मराठी गझल विश्वाला आपल्या लेखणीने समृद्ध करणाऱ्या इलाही जमादार यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्यानं मराठी गझल विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. इलाही यांच्या जाण्यानं गझल विश्वातील एक तारा निखळला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Previous Post

सलग चौथ्या वर्षी भाजपला महापालिकेत बजेट सादर करता येईना

Next Post

यशस्वी अँजिओप्लास्टी, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज

Next Post
यशस्वी अँजिओप्लास्टी, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज

यशस्वी अँजिओप्लास्टी, सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group