नवी दिल्ली : संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांना झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन झाले. बंगळुरुतील रुग्णालयात आठवड्याभराच्या उपचारांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. 8 डिसेंबरला तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते.