No Result
View All Result
- मुंबई – राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर, या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे. यात नागपूरला झुकतं माप दिल्याचे विश्लेषणातून स्पष्ट होत आहे.
- अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरसाठी भरघोस निधी दिला असून मोठ्या प्रमाणात विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी 228 कोटींची तरतूद केली आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वरसाठी 20 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- याशिवाय, नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (43.80 कि. मी) 6708 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी निधी देण्यात आला आहे, तर नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटींची तरतूद केली आहे.
- नागपुरात 1000 एकरावर लॉजिस्टिक हब करण्यात येणार आहे. याशिवाय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर आणि महाराष्ट्र राष्ट्रीयविधी विद्यापीठ, नागपूर इमारत बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे. तसेच नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी 100 कोटी तर, श्री संत जगनाडे महाराज आर्टगॅलरी, नागपूरसाठी 6 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या शिवाय, मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली आहे.
No Result
View All Result