सोलापूर – आपल्याला कोणताही कोर्स करायची इच्छा व्यक्त करा व शासनाच्या वतीने अल्प फी मध्ये किंवा विनामूल्य करा असे प्रतिपादन मंत्री कौशल विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता महाराष्ट्र राज्य यांचे विशेष कार्य अधिकारी पंकज पाठक यांनी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा सहायक आयुक्त कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर संगीता खंदारे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडवे सोलापूर जिल्ह्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर संस्थेचे विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड सचिव रुपेश गायकवाड उपस्थित होते.






विश्वकर्मा फाउंडेशन च्या वतीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत मोफत रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणात कस्टमर केअर एक्झिक्युटिव या कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी पंकज पाठक बोलत होते ते म्हणाले की पूर्वी शासनाची योजना होती हात दाखवा व बस थांबवा तसेच आपण आपली एखादा कोर्स करायची इच्छा व्यक्त करावी व शासन तो कोर्स आयटीआय मध्ये स्टेप योजनेअंतर्गत सुरू करेल असे त्यांनी सांगितले हे सरकार आल्यापासून सरकारने आयटीआयच्या पुनर्विकासासाठी विविध उपक्रम केले आहेत जसे 511 गावात जी गावे छोटी आहेत ज्या ठिकाणी खाजगी संस्था पोचू शकत नाही अशा गावात 511 स्किल सेंटर सुरू केले हा शासन आपल्या दारी हे वाक्य खरे करण्याचा प्रयत्न आहे आयटीआय मध्ये न्यू एज कोर्सेसच्या माध्यमातून ऍडव्हान्स कोर्सेस सुरू केले आहेत त्यामुळे आगामी काळात चांगले व्यवसायिक उद्योजक तयार करू तसेच जगभरात लेबरची मागणी आहे त्यामुळे आयटीआय मध्ये विविध देशाच्या भाषा शिकवण्याचे कोर्सेस सुरू केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुहासिनी शाह यांनी मनोगत व्यक्त करताना सोनामाता शाळेमध्ये जी शाळा वंचित समाज व आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या वस्तीत आहे अशा शाळेमध्ये हे प्रशिक्षण केंद्र सुरू होत असल्यामुळे आनंद व्यक्त केला तसेच या परिसरात आणखीन काही तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्याची विनंती विश्वकर्मा फाउंडेशन चे अध्यक्ष संतोष गायकवाड यांना केली त्यांनी आपल्या मनोगतात सोनामाता शाळेच्या विकासाची माहिती दिली तसेच प्रिसिजन फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली.
प्रास्ताविक करताना विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी विश्वकर्मा फाउंडेशन सध्या करीत असलेल्या विविध कामाची व प्रकल्पाची माहिती दिली संस्थेची आगामी दिशा काय असेल याबाबत सांगितले.
चित्रलेखा अत्रे यांनी रामवाडी लिमयेवाडी या वंचित व आर्थिक दृष्ट्या कमजोर वस्तीत स्वतःची जागा संस्थेस दान देऊन ही संस्था सुरू केली तसेच संस्था उभारण्यासाठी आपले आयुष्य वेचले त्यांच्या या कर्तुत्वाचा सन्मान म्हणून विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला.
पाहुण्यांचे स्वागत विश्वकर्मा फाउंडेशन चे सचिव रुपेश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन चन्नवीर बंकुर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर सुतार,श्रीकृष्ण गायकवाड,समर्थ कळके,रेखा केंगार,अनिता आयवळे,लक्ष्मी मिश्किन,पूजा कुडल यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम घेण्यासाठी संस्थेच्या सचिव सुवर्णा अत्रे, मुख्याध्यापक शिंदे व इतर शिक्षक आणि कर्मचारी यांनी मोलाची मदत केली..

