सांगली : काही दिवसांपूर्वी सांगली मधील सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी मागवलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील सलगरे मध्ये होणारा ‘ड्रायपोर्ट’ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट करणार नसल्याचे स्पष्ट झाले होते पण खा संजय पाटील यांनी हा ड्रायपोर्ट सलगरे मध्येच होणार असून तो नॅशनल हायवे लॉजिस्टिक ऑथॉरिटीज कंपनी लि या कंपनीशी या संदर्भात बोलणे सुरु असल्याचे सांगून वेळ मारून नेली खरी पण आज आणखी एका धक्कादायक गोष्टीने सांगलीच्या विकासाला खीळ बसणार आहे, ती गोष्ट म्हणजे सांगली रेल्वे स्थानकाचा विस्तार प्रकल्पही रद्द होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत दोन नवीन प्लॅट फॉर्म, एक नवीन पूल आणि प्रशस्त पार्किंग सह रेल्वे वाहतूक व्यवस्थापन सोईचे आणि अधिक चांगले होणार होते पण निमित्त ठरले सध्या सुरु असलेला रेल्वे च्या दुहेरीकरण प्रकल्पाचे. केवळ यासाठी रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे काम रद्द च करावे लागले आणि सांगलीकरांना रेल्वे प्रशासनाने थेट बोट दाखवले ते अमृत भारत योजनेकडे .
या नव्या योजनेसाठी आता सांगलीकरांना नेहमी प्रमाणे प्रतीक्षा च करावी लागेल असे दिसते. कारण या योजने मधून या स्थानकासाठीची परवानगी आणि इतर गोष्टीना किती अजून कालावधी लागेल सांगता येत नाही याबाबत खा संजय पाटील यांची इच्छाशक्ती किंवा राजकीय दबाव कमी पडतोय का ? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.