आज 15 ऑगस्ट 2024 भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडसाळी येथे अतिशय थाटामाटात पार पडला. प्रभात फेरी नंतर ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिना बद्दल विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणं सादर केली. भाषण करणाऱ्या सर्व 45 विद्यार्थ्यांना गाव कामगार कोतवाल देविदास पवार यांच्या कडून प्रत्येकी 50 रुपये रोख बक्षीस देण्यात आले.
गावातील दानशूर व्यक्ती काशिनाथ नागनाथ धर्मे सर यांनी शाळेत शिकत असलेल्या अनाथ, होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व इतर वाचन, लेखन, शैक्षणिक साहित्य असे जवळपास 15000/- रुपयेचे साहित्य दिले.
तसेच शाळा व्यवस्थापन समिती पडसाळीचे अध्यक्ष आनंद प्रभाकर फंड यांनी विद्यार्थ्यांना खेळाची गोडी लागावी व त्यांनी विविध खेळात प्रावीण्य मिळवावे म्हणून शाळेतील सर्वच्या सर्व 239 विद्यार्थ्यांना 86230/- रुपये रक्कमेचे स्पोर्ट किट चे वाटप केले.
शिष्यवृत्ती परीक्षा पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी विराज भाऊसाहेब घोडके व नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यांमध्ये यश मिळवणारा विद्यार्थी ओम ज्ञानेश्वर सिरसट याचे पालक ज्ञानेश्वर सिरसट व मार्गदर्शक शिक्षक हेमंत आलाट गुरूजी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणारे विद्यार्थी यांचा ग्रामस्थांनी यथोचित सत्कार केला.
शेवटी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ व पालक यांच्या तर्फे भरपूर खाऊ वाटप करून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम सोहळा आनंदी वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी सरपंच समाधान रोकडे , उपसरपंच ज्योतिराम पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद फंड, उपाध्यक्ष विनोद भोसले तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच गावातील आजी-माजी सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास राऊत गुरूजी यांनी तर आभार हेमंत आलाट गुरूजी यांनी मानले.