सोलापूर । चेन्नई, राज्य तामिळनाडु येथील एलिफंट गेट पोलीस स्टेशन हददीमध्ये अज्ञात लोकांनी पैशाचे कारणांवरून तीन ईसमांवर गोळीबार करून खुन केला असुन, खुन करणारे आरोपी हे लाल रंगाच्या व्हाॅल्सवेगन कारमधुन हैद्राबाद ते सोलापूर रोडने पुण्याचे दिशने फरार झालेबाबत माहिती प्राप्त झाली होती. लागलीच पोलीस अधीक्षक साो, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व सोलापूर तालुका पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदाराचे पथक तयार करून हैद्राबाद रोडच्या दिशेने रवाना करण्यात आले होते.
गाडीचा शोध घेत असताना संशयीत हाॅल्सवेगन गाडी बोरामणी गावाच्या शिवारामध्ये दिसल्याने तिचा पाठलाग करित असताना सदर गाडीतील लोक संशय आलेने गाडीसह सोलापूरचे दिशेने पळून जावू लागलेने सदर गाडीचा सिनेस्टाईल प्रमाणे बोरामणी येथुन पाठलाग करत असताना सदरचे वाहन हे मुळेगाव तांडा येथे आले असता गाडीतील संशयीत इसमांनी सदर वाहन परत हैद्राबादच्या दिशेने वळवून घेवून जावू लागले असता त्यांचा मुळेगाव तांडा परिसरात हैद्राबाद सोलापूर रोडवर पाठलाग केला असता सदर वाहन चालकांनी वाहन न थांबवता बेदरकारपणे चालवलेने सदर वाहनास सरकारी वाहने आडवे लावून सदरचे वाहन थांबवण्यात आले.
सदर गाडीची पाहणी करता सदर गाडीचा क्रं U p 16 A H 8349 असा होता. सदर गाडीची तपासणी करता गाडीतून तीन आरोपी मिळुन आले. त्यांचेकडे त्यांनी एलिफंट गेट पोलीस स्टेशन चैन्नई तामिळनाडु येथे गु.र.नं. 916/2020 भा.द.वी.कलम 302, 34 आर्म अँक्ट 3, 27 प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये वापरलेले एक रिव्हाॅल्वर व तिन जिवंत काडतुस मिळुन आले. गुन्हयातील सदर वाहन, रिव्हाॅल्हर व तीन जिवंत काडतुस गुन्हयाच्या कामी C 2 काशीमेडु
पोलीस स्टेशन, जि. चेन्नई येथील पोलीस निरीक्षकपी. जवाहर यांनी जप्त केले. व आरोपींना ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी मा. तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, अतुल झेंडे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्षनाखाली, अरूण सावंत, पोेलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे षाखा, सोलापूर ग्रामीण, सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सपोनि सचिन हुदळेकर, पोहेकाॅ/ संजय देवकर, पो.ना. प्रकाश क्षिरसागर, पोना/ अनिस शेख, पोना/ राहुल कोरे, पोकाॅ/ शशि कोळेकर, चापोकाॅ/ बसवराज अष्टगी, चापोकाॅ/ कदम, पोकाॅ/ मोहन मोटे, ने. सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, पोहेकाॅ/ सचिन वाकडे, पोहेकाॅ/ श्रीकांत गायकवाड, पोना/ परषुराम शिंदे, पोना/ लालसिंग राठोड, पोकाॅ/ रामनाथ बोंबीलवार ने. स्था.गुन्हे षाखा, पोकाॅ/ अन्वर अत्तार ने. सायबर पोलीस येथील यांनी सदरची कामगीरी पार पाडली आहे.