येस न्युज मराठी नेटवर्क । गेले ते कोरोनाचे दिवस आणि राहिल्या त्या कटू आठवणी या वाक्याप्रमाणे सोलापुरात सोमवारी सकाळपासूनच उत्साहाचे उधाण आले आहे. गेल्या दोन महिन्यापासून मॉर्निंग व सायकलिंग, खेळाची मैदाने बंद होती त्यामुळे सोमवारी सोलापूर अनलॉक झाल्यानंतर ठिकठिकाणी उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी स्मार्ट सिटी मुळे खोदलेले चौकातील रस्ते त्यातच निर्बंध उठल्यामुळे आणि चौकात ट्राफिक जाम झाले होते. शिवाजी चौक परिसरात देखील वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. आज पासून सर्वच प्रकारच्या दुकानांना वेळेचे कोणतेही बंधन नाही शिवाय रेस्टॉरंट मध्ये 50 टक्के क्षमतेने बसून नाश्ता आणि भोजनाचा देखील आस्वाद घेता येत असल्यामुळे आणि प्रवासा वरील e पास बंधन ह हटविल्यामुळे दोन महिन्यापूर्वी ज्याप्रमाणे सोलापूर शहर गजबजले होते त्याच प्रमाणे सोलापूर गजबजून गेले आहेत…