प्रिसिजन वाचन अभियान सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले. दुसऱ्या वर्षातील पहिला कार्यक्रम दिमाखात निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न झाला.
डॉ.मिलिंद पटवर्धन, डॉ.सुहासिनी शहा, अनुबंधचे प्रकाशक अनिल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत डॉ .अनिकेत देशपांडे यांचा थोडसं कडू आणि खूपच गोड या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साही वातावरणात आणि रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाला मधुमेह तज्ञ डॉ.मिलिंद पटवर्धन, डॉ. सुहासिनी शहा, तसेच अनुबंध प्रकाशनाचे अनिल कुलकर्णी यांची तसेच प्रिसिजनचे अध्यक्ष यतीन शहा हे देखील आवर्जून उपस्थित होते.
प्रकाशनानंतर लेखक डॉ. अनिकेत देशपांडे आणि डॉ. मिलिंद पटवर्धन यांची संवादात्मक मुलाखत शिरीष देखणे यांनी घेतली.
यावेळी डॉ. पटवर्धन यांनी, “साखर आहारातून वर्ज्य करावी,” असा महत्वपूर्ण सल्ला देत साखर आपल्या शरीराला किती घातक आहे हे पटवून दिले.
मधुमेहाविषयी गैरसमज दूर व्हावेत आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग वाचकांना मिळावा ही पुस्तक लेखनामागची भुमिका आहे असे डॉ.अनिकेत देशपांडे यांनी सांगितले.
पुस्तकातील काही निवडक उतारे अभिवाचनकार धनंजय गोडबोले यांनी रसिकांसमोर सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभारप्रदर्शन माधव देशपांडे यांनी केले.