मुंबई : राज्यात करोनाची रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने आता १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. इतकंच नाहीतर राज्यात रेड झोन असलेल्या १४ जिल्ह्यांना वगळता इतर ठिकाणी नियम शिथिल करण्यात येणार आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता १ जूननंतर लॉकडाऊन हटवणार का ? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांना रेड झोन म्हणू घोषित करण्यात आलं आहे.
या जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन असलं तरी करोनाच्या रुग्णांध्ये घट होताना दिसत नाही. त्यामुळे हे १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येतील. दरम्यान, यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलसंबंधीही महत्त्वाची माहिती दिली आहे.