सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस आणि इच्छा भगवंताची परिवार आयोजित महिला सर्वरोग निदान आरोग्य शिबिरात पाच हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, मनपा आयुक्त शीतल तेली-उगले, इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण जाधव, आ. यशवंत माने, आ. संजय शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, राजन पाटील, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, महिला निरीक्षक रुपाली पांढरे, युवती सोनाली गाडे चेअरमन कल्याणराव काळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेश पालवे, पंढरपूरचे श्रीकांत शिंदे, रुक्मिणी जाधव, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रारंभी आयोजक तथा माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मान्यवरांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच ज्येष्ठ महिलांना साड्या तसेच आरोग्य कीट देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, इच्छा भगवंताची परिवारातील सभासद परीश्रम घेतले..