येस न्युज मराठी नेटवर्क : एक-दोन दिवसांत घडलेल्या सर्वच घडामोडी अतिशय विचित्र आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली.सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज(शुक्रवार) सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील निवासस्थानी छापा टाकला. तसेच, ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानासह त्यांच्या निकटवर्तीयांकडे देखील छापे टाकल्याचे समोर आले आहे. याबद्दल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.या संदर्भात मी काही बोलण्याची गरज आहे, असे वाटत नाही. यंत्रणेचा तपास सुरू आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट पण आहे. त्यामुळे या संदर्भात मी जास्त बोलण उचित ठरणार नाही. ”असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.