नागरीकांनी 0217-2990002 या क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहन
सोलापूर (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने ,42 (अ.जा) लोकसभा मतदारसंघांतर्गत,248 ,सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रक्रिया पार पाडावयाची असल्याने आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून , नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्र. 0217-2990002 असा असून या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन अति.सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा 42-(अ.जा) सोलापूर लो. मतदारसंघ अंतर्गत 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ सोलापूर यांनी केले आहे. हा आचारसंहिता कक्ष 24 तास सुरू राहणार आहे.