सोलापूर – श्राविका संस्थेच्या उमाबाई श्राविका विद्यालयांमध्ये पक्षांसाठी चारा व पाणी पिण्यासाठी बर्ड फिडरची सोय करण्यात आली आहे. वाढत्या उन्हामुळे पक्षी पाण्याच्या शोधामध्ये भटकंती करत असतात तरीही पाणी मिळण्याची शाश्वती नसते म्हणून श्राविका शाळेतील तपन मधुसूदन दास या विद्यार्थ्याने पक्ष्यांच्या चारा पाण्यासाठी बर्ड फिडर हे शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे सर उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित मॅडम, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ प्राणिमित्र प्रेमी क्रीडशिक्षक शिक्षक सुहास छंचुरे सर व अनुप कस्तुरी सर यांच्याकडे भेट दिले. पाण्याची भटकंती थांबावी त्याच परिसरात व्यवस्था व्हावी म्हणून हा एक चांगला प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून होत आहे.
सर्व पक्षीप्रेमी लोकांनी आपल्या घराच्या गॅलरीमध्ये व जुन्यामध्ये गच्चीवर परसबागेत अशा प्रकारे पक्षांची चारा पाण्याची व्यवस्था केल्यास पक्षांचा वावर वाढून पर्यावरण सुदृढ राहण्यासाठी मदत होईल असे आव्हान प्रशालेचे पक्षीमित्र सुकुमार वारे सरांनी केले आहे. यासाठी प्रशालेचे प्रविण शहा, विश्वजित मोहोळे, प्रविण कंदले, माधवी खोत, प्रशालेतील कर्मचारी बसपा कुंभार, हरी ऐवळे, विद्या कासार, कांबळे मावशी यांनी परिश्रम घेतले.