सोलापूर- येथील शरदचंद्र पवार प्रशालेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक सुरेश जाधव, संचालिका रेखाताई सपाटे, मुख्याध्यापक तानाजी माने यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक वर्गासमोर फुग्यांच्या कमानी उभ्या करण्यात आल्या होत्या. आज पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाची पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
नवीन पुस्तके, गुलाब फूल देऊन स्वागत यामुळे मुले भाराऊन गेली . विद्यार्थ्याचे स्वागत करीत असताना मुख्याध्यापक तानाजी माने यांनी विद्यार्थी व पालक यांना संबोधित करताना या शैक्षणिक वर्षापासून सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन वर्ग , इंग्लिश स्पिकिंग इत्यादी वर्गाचे आयोजन केल्याचे सांगितले. सदर स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील शिक्षक राजाराम शितोळे यांनी तर सूत्रसंचालन अविनाश आलदर यांनी केले. सदर विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभास प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.