सोलापूर यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर आप्पा सपाटे ,सुरेश जाधव, मंजुश्री पाटील, मुख्याध्यापक तानाजी माने, ज्येष्ठ शिक्षिका सुचिता सपाटे ,स्नेहलता देशमुख यांनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
प्रारंभी विद्येची देवता सरस्वती व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .मुख्याध्यापक तानाजी माने यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना क्रीडा ,कला, संस्कृतीक, स्पर्धा परीक्षा या सर्वच क्षेत्रांमध्ये शाळेची घोडदौड होत असून याही वर्षी नीट व जेईई चे फाउंडेशन क्लास घेण्यात येणार असल्याचे सांगितले . पाठीमागच्या वर्षी एन. एम. एम. एस.परीक्षेत यावर्षी सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले असून या शैक्षणिक वर्षांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल या दृष्टिकोनातून नियोजन केले असल्याचे सांगितले.
मंजुश्री पाटील व ज्ञानेश्वर आप्पा सपाटे यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश आलदर यांनी केले तर शेवटी आभार श्रीराम बरगंडे यांनी मांडले.